उरणच्या कॉन्वेअर सीएसएफ वेअरहाऊसमधील प्रश्न मार्गी; तीन महिन्यांची मुदतवाढ

पनवेल :  पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या कॉन्वेअर सीएसएफ या वेअरहाऊसमधील कामगारांना माजी खासदार  रामशेठ ठाकूर यांच्यामुळे न्याय मिळाला आहे. या वेअरहाऊससाठी जीएडी लॉजिस्टीकला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबद्दल कामगारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत. उरण तालुक्यातील धुतूम येथे पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या कॉन्वेअर सीएसएफ वेअरहाऊस हे जानेवारी ते मार्च असे तीन महिने बंद होते. या वेअरहाऊसाठी तीन वेळा टेंडर काढण्यात आले होते, मात्र कोणीही टेंडर भरले नाही. त्यामुळे वेअरहाऊसमध्ये काम करणार्‍या सुमारे 350 स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.

स्थानिकांच्या कामाच्या प्रश्नासंदर्भात भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जय भारतीय कमागार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी अनेक वेळा चर्चा केली. अखेर या कामगारांच्या प्रश्नाबाबात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी प्रयत्न केले. त्यानुसार या वेअरहाऊससाठी जीएडी लॉजिस्टीकला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने कामगारांचा कामाचा प्रश्न सुटला आहे. त्या अंतर्गत या पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या कॉन्वेअर सीएसएफ वेअरहाऊसचे गेट माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 18) श्रीफळ वाढवून उघडण्यात आले. या वेळी जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, जीएडी लॉजिस्टीकचे मॅनेजिंग डारयेक्टर जमीर शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एकविरा महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन