फ्लेमिंगो सिटीतील फ्लेमिंगो शिल्पाकृतींची पडझड
नवी मुंबई -: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून महापालिकेच्या वतीने फ्लेमिंगो सिटी ही संकल्पना पुढे आणत शहरातील चौका चौकात, रस्त्यावर तसेच नाल्यांवर फ्लेमिंगोच्या शिल्पकृती उभारल्या आहेत. मात्र स्वच्छ भारत अभियान स्पर्धा संपण्याच्या आतच या फ्लेमिंगोची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मनपाकडुन करण्यात येत असलेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नवी मुंबई शहरातील नेरूळ, ठाणे खाडी किनारी ऐरोली, वाशी, बेलापूर इत्यादी ठिकाणच्या खाडीकिनारी कसं पाणथळ जागेत मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्थलांतर होत असते. फ्लेमिंगो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची, पर्यटकांची, उत्सुकता निदर्शनास येते, त्यामुळे नवी मुंबई ही आगामी कालावधीत फ्लेमिंगो सिटी ओळखावे म्हणून नवी मुंबई महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षण अभियानांतर्गत भिंतीचित्रांमधून 'फ्लेमिंगो सिटी' म्हणून नवी मुंबईची असलेली ओळख अधोरेखीत व्हावी, तसेच भिंतीचित्रांप्रमाणे मुख्य चौक, कॉर्नर, दुभाजक अशा दर्शनी ठिकाणी लाखो रुपये खर्च करूनआकर्षक शिल्पाकृतींची उभारणी केलेली आहे. काही ठिकाणी या शिल्पात त्यांची पडझड झाल्याचे निदर्शनास येत आहे आणि त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे आढळत आहे. घणसोली नोसिल नाका ये रस्त्याच्या दुभाजकावर जाळ्यावर शिल्पाकृती असलेले फ्लेमिंगो स्विमिंग पूल तुटलेल्या अवस्थेत आढळत आहेत. कोणाची चोच तर कोणाचे इतर अवयव तुटलेले असून केवळ अर्धा भाग राहिलेला आहे. स्वच्छता सर्वेक्षण अभियानात शहरात सुंदरता वाढवण्यासाठी हे फ्लेमिंगो बसवण्यात आलेले आहेत. मार्च एप्रिल महिन्यामध्ये केंद्रीय पथक स्वच्छता सर्वेक्षणचा दौरा करत असते. मात्र स्वच्छ भारत अभियान स्पर्धा संपण्या आधीच काही भागात फ्लेमिंगो शिल्पाकृती तुटलेल्या असल्याने स्थापत्य विभाग करीत असलेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.