दिवाळे गाव येथे मारुती जन्मोत्सव उत्साहात साजरा
नवी मुंबई:- हनुमान जयंतीचे औचित्य साधून दिवाळे गाव येथील हनुमान मंदिरात मारुती जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी फगवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनंता बोस, खांदेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष रमेश हिंडे, भाग्यवान कोळी, परशुराम पाटील, अशोक गझणे, ज्ञानेश्वर कोळी, भारती पाटील कोळी तसेच असंख्य भाविक उपास्थित होते. मारुती जन्मोत्सवात विविध मंडळाचे भजन कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच सायंकाळी पारंपरिक पद्धतीने नाचत गाजत हनुमान पालखी काढण्यात आली. पालखीस दिवाळे कोळीवाड्यातील समस्त ग्रामस्थ भाविकांचा सहभाग होता.