अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने महापौर प्रतिभा पाटील सन्मानित

नवी मुंबई: भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभा विलास पाटील यांना राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामुळे महापौर पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

महापौर पाटील या २०१२ पासून म्हणजेच एका दशकाहून अधिक भिवंडी निजामपूर पालिकेच्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांची २०१२ ते १४ दरम्यान प्रथमच महापौर म्हणून निवड झाली. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा त्यांना महापौरपदाची संधी मिळाली. त्यांनी प्रशासनावर उत्तमरीत्या छाप पाडली आहे. 

महापौर पदाला न्याय देत असतानाच प्रतिभा पाटील ह्या एमएमआरडीएच्या सदस्या व स्टेम प्राधिकरणाच्या सह अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.आपले सासरे स्व.आर.आर.पाटील यांच्या समाजसेवेचा वारसा त्या अप्रतिमरीत्या पुढे चालवीत आहेत.

कोरोनासारख्या महामारीत पालिकेच्या क्षेत्रात हा संसर्ग पसरणार नाही. यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. शहरातील कोरोनाच्या वाईट काळात गोरगरिबांना जेवणाची सोय व्हावी. तसेच कोणताही घटक उपाशी राहू नये. म्हणून कम्युनिटी किचन ही संकल्पना राबविली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या प्रयत्नशील असून महिलांना रोजगाराच्या संधी कशा मिळतील. याकडे त्यांचा कटाक्ष असतो. या सामाजिक कार्याची दखल घेऊन आयोजकांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

'पुस्तक वाचनाने आम्ही वाचलो - तुम्हीही वाचा' युवा व्याख्यात्यांचे आवाहन