पनवेल महानगरपालिकेच्या चुकीच्या मालमत्ता करप्रणाली बाबत पाचवी याचिका दाखल

खारघर:  पनवेल महानगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या, चुकीच्या मालमत्ताकर कार्यप्रणालीच्या विरोधात कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने पाचवी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे..

पनवेल महानगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या दुहेरी मालमत्ता कराच्या विरोधात या पूर्वी चार याचिका दाखल करण्यात आले असून अजूनही सुनावणी झालेली नाही. दरम्यान पालिकेने लावलेली चुकीच्या मालमत्ता करप्रणाली रद्द करण्यात यावी, यासाठी कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने महानगरपालिकेला यापूर्वीच नोटीस देण्यात आली होती. परंतु सदर नोटीसला महानगरपालिकेकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. तसेच  मालमत्ता करप्रणाली रद्द  झाली नसल्यामुळे 

  कामोठे कॉलनी फोरमचे  अध्यक्ष मंगेश अढाव व डॉ. सखाराम गारळे, राहुल आग्रे, सुरेश सडोलीकर, मुकुंद शितोळे, धोंडिबा माने, आशिष म्हात्रे, उमेश गायकवाड , डॉ. दशरथ माने ह्यांच्या वतीने ॲड. समाधान काशीद  यांनी बुधवार ता.13 रोजी  उच्च न्यायालयात चुकीची मालमत्ता कर प्रणाली रद्द व्हावी, यासाठी याचिका दाखल केली होती.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने महापौर प्रतिभा पाटील सन्मानित