रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रिया धारक संघाच्या प्रमुख सल्लागार पदी बाळासाहेब शिंदे यांची नियुक्ती
वाशी, नवी मुंबई-: सहकार आणि पर्यावरण क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले पर्यावरण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदें यांची रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रिया धारक संघाच्या प्रमुख सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी काजू कारखानदार आणि काजू उत्पादक शेतकरी यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण जे प्रयत्न करत होतो ते यापुढे निरंतर चालू राहतील तसेच जिल्ह्यात रोजगार वाढवा यासाठी आपण नेहमी अग्रस्थानी राहू व वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी, मागे हटणार नाही असे मत यावेळी.बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले. यावेळी रत्नागिरी जिल्हा संघाचे अध्यक्ष विवेक बारगीर, महाराष्ट्र काजू संघाचे सदस्य संदेश दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पवार,सचिव संदेश पेडणेकर, खजिनदार मुकेश देसाई, सदस्य दिनेश पवार, सदस्य तौफीक खतीब उपस्थित होते.