नेरुळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न
नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नेरूळ ब्लॉक कॉग्रेसच्या वतीने नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर व नेत्र चिकित्सा शिबिर उत्साहात पार पडले.
नेरूळ सेक्टर २ मधील कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू मिलेनिअम हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य शिबिर तर रामक्रिष्णा नेत्रालयाच्या सहकार्याने नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तसेच नेरूळ सेक्टर १६ मधील जीवनज्योती आशालय या अनाथाश्रमाला भेट देवून येथील बालकांना पेन, पुस्तक या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्या भांडेकर यांच्यासमवेत राहूल कापडणे, सीमा वाघ, मारूती माने, कल्पना वाघमारे, पवित्रा सरडे, स्मृती पांचाळ, दिपक गावडे, कवलजित सोनावणे, स्वप्निल सोरटे, गौरव महापुरे व अन्य कॉंग्रेस पदाधिकारी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नेरुळ सेक्टर १८मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन रंगारी यांच्या पुढाकाराने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भीम अनुयायांनी मोठ्या उत्साहात साजरी केली .प्रारंभी, पंचशील ध्वजारोहण ,धम्मपूजा करण्यात आली धम्म प्रचारक कोंडीराम खरात यांनी आपल्या भाषणात बौद्ध धर्म आणि डॉ आंबेडकर यांचे तत्वज्ञान यावर मोलाचे मार्गदर्शन केले .