भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी
पनवेल बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शहरात भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, प्रकाश बिनेदार, राजू सोनी, महिला व बाल सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, भीम अनुयायांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गटातील भव्य निबंध व वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.