कोपरखैरणे मध्ये इमारत विकासकाकडून बांधकाम नियमांचे उल्लंघन ?
ऐरोली: कोपरखैरणे येथे एका एकवीस माळ्याच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.त्या इमारतीची बांधणी करताना पालिकेकडून निर्गमित करण्यात आलेल्या लेखी सूचना प्रमाणे करण्यात आली नाही.त्यामुळे नगररचना विभागाने स्थळ पाहणी करून बांधकाम संबंधी उल्लंघन केले असल्यास व निदर्शनास आल्यास चौकशी करून कारवाई करावी अशी लेखी मागणी चंदू पाटील या नागरिकांनी पालिका नगररचना विभागाकडे केली आहे.
कोपरखैरणे सेक्टर २ए परिसरातील भूखंड क्रमांक १२ व १३ वर द अड्रेस गृहनिर्माण सोसायटीला २०१५ मध्ये बांधकमा करण्यास परवानगी दिली गेली.पण ज्या प्रमाणे पालिकेने बांधकाम करताना लेखी सूचना केल्या त्याप्रमाणे बांधकमा करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे चौकशी करावी अशी लेखी मागणी नगररचना विभागाचे सोमनाथ केकान यांच्याकडे केली आहे.