कोपरी गाव तलावाची सुधारणा करण्याची मागणी
नवी मुंबई-:कोपरी गाव तलावातील मागील तीन वर्षांपासून गाळ साफ केलेला नाही. तसेच या तलावातील गॅबियन वाल पडली असून त्याचे दगड तलावात विखुरले आहेत. त्यामुळे श्री मुर्ती विसर्जन करताना स्वयंसेवकांना दुखापत होण्याची शक्यता अससल्याने या तलावाची तात्काळ सुधारणा करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहरातील तलाव अधीक सुंदर दिसावे म्हणून नवी मुंबई महानगरपालकेच्या वतीने २००९ साली तलाव व्हिजन अंतर्गत सुंदर अशा तलावांची निर्मिती केली आहे. तर सदर तलावात दरवर्षी मूर्ती विसर्जित होत असल्याने गाळाचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे सदर मूर्ती ठरवीक जागेत विसर्जित करता याव्या व तयार होणारा गाळ कमी वेळेत आणि कमी खर्चात साफ करता यावा तसेच तलावातील पाणी खेळते रहावे म्हणून महापालीकेने जर्मन तंत्रज्ञावर आधारित या तलावात ग्याबियन वालची निर्मिती केली आहे. मात्र सदर वाल तयार करून आज १२ ते १३ वर्षाचा काळावधी उलटल्याने या ग्याबियन वाल कमकुवत झाल्याने नुकतीच कोपरी गाव तलावातील गॅबियन वाल पुर्ण पणे ढासळली आहे. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी घाण झाले आहे. कोपरी तलावात मोठ्या प्रमाणात श्री मूर्ती विसर्जित केल्या जातात. मात्र गॅबियन वाल पडल्याने त्याचे दगड तलावात विखुरले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने आगामी गणेशोत्सवात श्री मूर्ती विसर्जित करतेवेळी स्वयंसेवकांना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर तलावाची तात्काळ सुधारणा करण्यात यावी अशी मागणी श्री मुर्ती विसर्जन स्वयंसेवकांकडुन जोर धरू लागली आहे.