आर टी ई अंतर्गत प्रवेश देण्यास डी ए व्हि शाळेची टाळाटाळ ?

नवी मुंबई-:आर.टी.ई २५ % अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मधील डी ए व्ही शाळा टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या शाळेला जाब विचारून प्रवेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी सिवूड शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी मनपा शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९  नुसार राज्यातील शाळांमध्ये ( सी.बी.एस.ई.) वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता  १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्गातील २५ % जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे . मात्र नेरुळ  सेक्टर ४८,सिवूड मधील डि.ए.व्ही. पब्लिक स्कूलने (सी.बी.एस.ई) विद्यार्थ्यांना आर टी ई अंतर्गत  प्रवेश देण्यासाठी पालकांना नकार देत आहे . शाळेमध्ये पालकांमार्फत आर ती ई ची सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्व करून गेले असता त्यांना विविध कारणे सांगून तुम्हाला प्रवेश मिळणार नाही असे उतरत शाळा प्रशासनामार्फत देण्यात  येत आहे. आर टी ई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे हा त्यांचा अधिकार व हक्क आहे परंतु तसे न होता महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन सदर शाळेमार्फत केले जात नाही असे दिसून  आहे .त्यामुळे सदर प्रकरणी मनपा शिक्षण अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देत  शाळेस लेखी पत्र व्यवहार करुन जाब विचारावा व पालक व विद्यार्थी यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ न देता आर टी ई विद्यार्थ्यांना  लवकरात लवकर प्रवेश  करून घ्यावेत असे सूचित करावे अशी मागणी  सिवूडचे  शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोपरी गाव तलावाची सुधारणा करण्याची मागणी