उष्म्या वाढल्याने  एपीएमसीत भाज्यांची दरवाढ

नवी मुंबई-: सध्या उन्हाचा पारा चढत चालल्याने वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक घटली असून जो काही भाजीपाला दाखल होत असतो त्यातील बहुतांश माल उन्हामुळे खराब होत आहे. त्यामुळे बाजारात जादा मागणी आणि पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ होत आहे. बाजारात २०%-२५ % दरवाढ झाली आहे. 

       एपीएमसी बाजारात टोमॅटो, भेंडी, कारली, फरसबी, पापडी, वांगी आणि पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.  हिवाळ्यात भाज्यांचे उत्पादन अधिक होत असते.त्यामुळे थंडीमध्ये बाजारात भाजीपाल्याच्या जवळ जवळ ५५०ते  ६०० गाड्या दाखल होतात. आता मात्र उन्हाळा सुरू होताच भाज्यांची आवक घटत आहे. १५० ते २०० गाड्या कमी झाल्या असून ४५०ते  ५०० गाड्या आवक होत आहे. उन्हाळा सुरू झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे असे मत घाऊक व्यापारी नाना बोरकर यांनी व्यक्त केले आहे. उन्हाळ्यात भाज्यांचे उत्पादन कमी होते असे ही त्यांनी सांगितले. तसेच सध्या उन्हाचा पारा वाढला असून कडक उन्हाने बाजारात दाखल होणारा भाजीपाला खराब होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दरवाढ होत आहे. घाऊक बाजारात भेंडी आधी २४ते २५ रुपयांवरुन आता ३०रुपये  तर पापडी  ७०-७५ रुवरून ९०रुपयांनी , टोमॅटो १४ते १५रुपयांवरून १८ते २०रु तसेच फरसबी ७०-७५ रुपयांवरून ८० ते ९०रु तर कारली २०-२२ रुवरुन  ३२ रुपये ,वांगी २६-२८रुवरुन आता ३४-३५रुपयांवर उपलब्ध आहेत.

भाजीपाला दरवाढ

भाजीपाला    आधी        आता     

टोमॅटो       १४-१५            १८-२०

भेंडी         २४-२५             ३०

कारली         २०-२२         ३२

फरसबी      ७०-७५        ८०-९०

वांगी          ३६-४०      ८०-१००

पापडी       ७०-७५       ९० 

फ्लॉवर   १०-१२         १४-१५

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आर टी ई अंतर्गत प्रवेश देण्यास डी ए व्हि शाळेची टाळाटाळ ?