वाशीचा अन्वय अभिलेश दंडवते याचे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश; राज्यातून दुसरा
नवी मुंबई : वाशी अन्वय अभिलेश दंडवते विद्यार्थ्यांची अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत निवड झाली आहे. राज्यातून दुसरा आला आहे. या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी त्याने जे कष्ट घेतले. त्यात त्याला यश आल्याने अन्वयचे कौतुक होत आहे.
सैनिक स्कूल हे भारतात 33 ठिकाणी आहेत. सैनिक स्कूल हे सैनिक स्कूल सोसायटी तर्फे चालविले जातात. समाजातील सर्व स्तरातील व देशाच्या सर्व भागातील लोकांना सैन्यदलात अधिकारी होता यावे. म्हणून भारत सरकारने संरक्षण खात्याच्या अधिपत्याखाली देशाच्या निरनिराळ्या भागात नॅशनल डिफेन्स अकॅडमी प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या संस्था काढावयाचे ठरविले. या 33 शाळांवर केंद्रीय संरक्षण खात्याचे प्रशासनिक नियंत्रण असते सैनिक स्कूल ची स्थापना विशिष्ट उद्दिष्ट एनडीए प्रवेश व सैन्यदलात अधिकारी ठेवून झालेली असल्यामुळे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने शाळा चालवली जात असल्याने येथील सर्व विद्यार्थी इतर शाळातील विद्यार्थ्यांन पेक्षा वरचढ असतात.
सैनिक स्कूल शाळा महाराष्ट्रात दोन शाळा सातारा व चंद्रपुर येथे आहेत. सैनिक स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रान्स एक्झाम द्यावी लागते. तीपात्रता परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेते. इयत्ता सहावी व नववी साठी प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते. 6 वी ची परीक्षा देण्यासाठी 300 मार्क चा पेपर विद्यार्थ्यांना दोन तास तीस मिनिटे मध्ये सोडवायचा असतो.
त्यामध्ये गणित, इंटलीजन्स, सामान्य ज्ञान व इंग्रजी हे विषय असतात विद्यार्थी वर्षभर परीक्षेची तयारी करतात. अन्वयने अधिकारी बनवण्याच्या दृष्टीने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेला बसण्याची तयारी सुरू केली त्यासाठी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची माहिती मिळाली. त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासेस चालू केले व नंतर २.५ महिने तळेगाव दाभाडे पुणे येथे त्यास तयारी करण्यासाठी पाठविले. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून दरवर्षी दहा ते पंधरा हजार तर देशभरातून दोन लाखापेक्षा जास्त मुले व मुली बसतात .या सर्व मुलांमधून अन्वयची निवड चंद्रपुर सैनिक स्कूल येथे प्रवेश घेण्यासाठी झाली.
या परीक्षेसाठी खूप मेहनत करावी लागते .इतर शाळांमधील आठवी व नववीचा अभ्यासक्रम येथे चौथी व पाचवी च्या मुलांना सोडावावे लागते. अन्वयने तळेगाव ला असताना १२ ते १४ तास अभ्यास केला जवळजवळ १०० पेक्षा जास्त पेपरचा सराव त्याने केला होता. आय कॅन ट्रैनिंग इन्स्टिटयूटचे नवनाथ देशमुख सर, गजानन गोरे सर यांनी अन्वयवर मेहनत घेतली.यामुळे तो परीक्षेत अंतिम निवड यादीतून राज्यात दुसरा येऊ शकला अशी प्रतिक्रिया अन्वयचे वडील अभिलेष दंडवते यांनी व्यक्त केली.