कार्ला गडावर लोटला भक्तांचा जनसागर

नवी मुंबई-: मागील दोन वर्षापासून कोविड निर्बंधांमूळे कार्ला गडावरील आई एकविरेचा पालखी सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात होता. मात्र यंदा कोविड निर्बंध शिथिल केल्याने शुक्रवारी कार्ला गडावर पालखी सोहळ्यानिमीत्त एकविरा भक्तांचा अलोट जनसागर लोटला होता. यावेळी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता.

कार्ला लोणवळा येथील आई एकवीराच्या मंदिरात दर वर्षी प्रमाणे चैत्र शुध्द सप्तमीस संध्याकाळी श्री एकविरा आईची पालखी काढण्याच्यी परंपरा  आहे. आई एकविरेच्या पालखी निमिताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः नवी मुंबई, मुंबई, ठाणे, भिवंडी ,रायगड येथील आगरी कोळी समाजातील भक्तगण पालखीत सामील होण्यासाठी आप-आपल्या गावातून पालख्या घेऊन मोठ्या संख्येने कार्ल्याला येतात. शेकडो मैलाचा पाई प्रवास करीत भाविक मोठया भक्तीभावात आईच्या पालखीत सामील होतात. 

 व ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत, वाजत-गाजत-नाचत गडावर  पालखी नाचवतात.मात्र मार्च२०२० मध्ये कोविड संक्रमण आल्याने शासनाने टाळेबंदी जाहिर केली होती. यादरम्यान मंदिरे देखील बंद ठेवण्यात आली होती.त्यामुळे सण २०२० व २०२१  मध्ये मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थित कोविड नियम पाळून आईचा पालखी सोहळा पार पडला होता.मात्र आता शासनाने मंदिरे खुली केली असून कोविड चे सर्व निर्बध शिथिल केले आहेत. त्यामुळे यंदा कार्ला गडावर मोठ्या उत्साहात पालखी सोहळा पार पडला.मागील दोन वर्षापासून पालखी सोहळ्यासाठी भक्त आसुसलेले होते.त्यामुळे यंदा  शुक्रवार ८ एप्रिल रोजी पालखी सोहळ्यासाठी  गडावर भक्तांचा जनसागर लोटला होता.दोन वर्षानंतर गडावर पालखी सोहळा होणार असल्याने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त गडावर ठेवला होता.त्यामुळे आईच्या जयघोषात अत्यंत शिस्त बध्दपद्धतीने  सदर पालखी सोहळा निर्विघ्न पणे गडावर पार पडला.

----------------------------------------------

कार्ला गडावरील आई एकवीरेवर  लाखो आगरी कोळी लोकांची श्रध्दा आहे. मात्र कोविड मुळे दोन वर्षापासुन   पालखी सोहळ्यात सामील होता नाही आले.मात्र यंदा निर्बंध हटल्याने पालखी सोहळ्यासाठी लाखो  भक्तांचे डोळे आसुसलेले होते.

अमर पाटील, सामाजिक कार्यकर्ते, गोठिवली गाव.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीचा अन्वय अभिलेश दंडवते  याचे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश; राज्यातून दुसरा