उष्मा वाढल्याने लिंबाच्या मागणीत वाढल्याने लिंबूचे दर कडाडले

नवी मुंबई-:उन्हाळा सुरू झाल्याने  उष्मा वाढत चालला असल्याने नागरीकांचा कल शितपेयांकडे कल वाढला आहे. त्यामुळे बाजारात लिंबूला प्रचंड मागणी वाढली आहे आणि याचा परीणाम लिंबुच्या दरांवर झाला असून लिंबुचे दर  प्रचंड वाढले असुन बाजारात लिंबू शेकडा ५०० ते ६०० रु विकला जात आहे.

सध्या उन्हाळा सुरू असल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. विशेषत: लेडीफिंगर, काकडी, हिरव्या भाज्यांच्या दराने सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा टाकला आहे. आणि या कोट्यामध्ये लिंबाचा भाव आजच्या तारखेत पेट्रोल आणि डिझेलपेक्षा महाग झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी  लिंबाचा भाव २०० ते ३०० रु शेकडा होता. मात्र आता उन्हामुळे लिंबाला मागणी वाढत चालल्याने दरात प्रंचड वाढ झाली आहे. वाशीच्या एपीएमसी बाजारात शुक्रवारी ४ ट्रक व ९ टेम्पोची आवक झाली असून शेकडा ५०० ते ६०० रु दराने लिंबू विकला जात आहे. तर ही वाढ अजून पंधरा ते वीस दिवस अशीच राहणार असल्याची माहिती एपीएमसी मार्केट मधील भाजी विक्रेता संदीप मिश्रा यांनी दिली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डोके चालवण्याची प्रेरणा देणारे बाबासाहेब आंबेडकर स्मारक - श्री.अरविंद जगताप*