सामाजिक कार्यकर्त्या अर्चना पारठे यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कार जाहीर

नवी मुंबई:जळगाव येथील आदिल शाह फारुकी या बहुउद्देशीय संस्थेकडून दरवर्षी राज्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम  पुरस्कार दिला जातो.यावर्षी कोपरखैरणे येथील सामाजिक कार्यकर्त्या अर्चना पारठे यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम  पुरस्कार  जाहीर झाला असल्याचे संस्थेकडून जाहीर करण्यात आले आहे.

अर्चना पारठे या मागील एका दशकाहून अधिक काळापासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत.त्यांनी विशेषतः महिला, युवतींवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच त्या नेहमीच शासकीय राष्ट्रीय कामात पुढे असतात.त्यांच्या या कामाची दखल आदिल शाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेने घेतली आहे.

पुरस्कार वितरण समारंभ ४ मे रोजी आहे. त्यांना पुरस्कार घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष फारुख शाह नौमानी, उपाध्यक्ष डॉ.जावेद शेख, विशेष सल्लागार उस्मान फकिरा पटेल आणि सचिव जुबेर शाह यांनी आपल्या सहिनीशी कळविले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोव्हीड काळात केलेल्या समर्पित कामाबद्दल नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचा "कोव्हीड योध्दा सन्मान"