पनवेलमध्ये लेकींच्या आरोग्याची काळजी 

  पनवेल: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय 'गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण' शिबिराला आजपासून (दि. ०८) सुरुवात झाली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे असलेल्या या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर आणि  कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशनचे संस्थापक चेअरमन डॉ. योगेंद्र सपरु  यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशनच्या सीईओ अलका बिसेन,  कार्यकारी संचालिका डॉ. धनंजया सारनाथ, डॉ. भावना शर्मा, उपमहापौर सीता पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहराध्यक्षा वर्षा नाईक, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेविका राजेश्री वावेकर, डॉ. संतोष आगलावे,  डॉ. कृष्णा देसाई, डॉ. राजेश सोनार, क्रीडा शिक्षक डॉ. विनोद नाईक, डॉ. आर. व्ही. येवले, आदी उपस्थित होते. 
 
           गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते आणि ही चाचणी महागडी असल्याने महिला वर्ग याकडे दुर्लक्ष करतात.बाजारात या एका चाचणीसाठी सुमारे सात ते नऊ हजार रुपयांचा खर्च येतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा एचपीव्हीच्या 'हाय रिस्क' प्रकारच्या विषाणूमुळे होतो. महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा दुसरा क्रमांक लागतो. महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय  आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत पहिल्या लसीकरण डोस महाशिबिर पार पडले होते. त्या शिबिरात ०१ हजार मुलींचे मोफत लसीकरण झाले होते, त्या पहिल्या डोस घेतलेल्या लाभार्थींना दुसरा डोस देण्यासाठी या शिबिराचे आयोजन ०८ आणि ०९ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सामाजिक कार्यकर्त्या अर्चना पारठे यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कार जाहीर