रेल्वे गुडस यार्ड मध्ये भोजनालय व स्वच्छ शौचालय उपलब्ध करण्याची मागणी
नवी मुंबई-: तुर्भे सेक्टर २० येथील रेल्वे गुडस यार्ड मध्ये कामगारांनसाठी भोजनालय व स्वच्छ शौचालय नसल्याने कामगारांना नाहक त्रास होत आहे.त्यामुळे याठिकाणी भोजनालय व स्वच्छ शौचालय उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी रेल्वे डिव्हिजन मॅनेजर तुर्भे यांच्या कडे केली आहे.
भारतीय रेल्वे दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे प्रगती करत असून जागतिक पातळीवर नावलौकिक होत आहे. परंतु वाशी येथील तुर्भे रेल्वे यार्ड गेली अनेक वर्षांपासून अनेक सुविधांपासून वंचित आहे.या टर्मिनल यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे काम अविरत पणे चालू असते.या ठिकाणी हजारो माथाडी कामगार,जनरल कामगार, वाहुकदार व रेल्वे कर्मचारी सतत रात्रंदिवस मेहनतीचे काम करत असतात.परंतु या ठिकाणी यार्ड मध्ये भोजनालय,पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय नसून या कर्मचारी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एकीकडे केंद्र सरकार मार्फत सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबवले जात असून नागरीकांना सर्व सोयीसुविधा तसेच स्वच्छतेबाबत महत्त्व पटवून जनजागृती केली जात असताना तुर्भे रेल्वे यार्ड सुविधांचा वानवा आहे.यामुळे रेल्वे यार्ड अस्वच्छ झाले असून मोठ्या प्रमाणात कामगार व वाहन चालक यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे जाणवते आहे.त्यामुळे रेल्वे यार्ड मध्ये स्वच्छ पाणी, भोजनालय व आधुनिक शौचालय तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली मागणी रेल्वे डिव्हिजन मॅनेजर तुर्भे यांच्या कडे आहे.
याप्रकरणी लवकरच रेल्वेला प्रस्ताव पाठवून सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन रेल्वे चीफ गुडस सुपरवायझर अधिकारी सुनील डिकोंडा यांनी दिले. विनायक जाधव,संकेत निवडुंगे, सुरेश दाम,कामगार मारुती भिसे,व माथाडी कामगार उपस्थित होते.