‘सानपाडा बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद; आस्थापने, दुकाने १०० टक्के बंद
नवी मुंबई ः सिडको, महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी घतलेल्या सानपाडा रहिवाशी विरोधी निर्णयाविरोधात ७ एपिल रोजी सानपाडा बंदची हाक देण्यात आली होती. अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अखिल सानपाडा रहिवासी महासंघ यांच्या वतीने आयोजित ‘सानपाडा बंद’मध्ये शैक्षणिक संस्था, अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने आणि आस्थापना स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे सानपाडा मध्ये कडकडीत बंद
पाळण्यात आला. दरम्यान, सानपाडा वासियांच्या आंदोलनाची दखल घत ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी येऊन पाहणी करीत लवकरच न्यायालयाला योग्य तो अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी प्रतिष्ठान आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुकारलेले उपोषण आंदोलनही महापालिका अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले.
सानपाडा, सेक्टर-८/९ चा परिसर हिंदू बहुल आहे. असे असतानाही ‘सिडको’च्या तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी प्रेससाठी राखीव असलेल्या सदर ठिकाणच्या भूखंडावरील आरक्षण उठवितानाच एकाच धर्मासाठी त्यावरील आरक्षण उठवून भूखंडाचा काही भाग वाटप केला आहे. त्यामुळे ‘सिडको’ने केलेल्या या प्रकाराविरोधात सानपाडा मधील हिंदू धर्मासह इतर धर्मियांनी सदर भूखंड वाटपाला तीव्र आक्षेप घतला आहे. यासाठी अखिल सानपाडा
सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अखिल सानपाडा रहिवासी महासंघ यांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सिडको, महापालिका आणि पोलीस प्रशासनकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच सदरचे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ झाले आहे.
एकंदरीतच सदर प्रकरणात सिडको, नवी मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने या रहिवाशी निर्णयाविरोधात सानपाडा मध्ये ७ एप्रिल रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी अखिल
सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अखिल सानपाडा रहिवासी महासंघच्या माध्यमातून रहिवाशांनी लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरु केले होते. अखेर या आंदोलनाची दखल घत ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी,सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांनी सानपाडा विभागात येऊन सर्वप्रथम वादग्रस्त भूखंड वाटप स्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी आंदोलनकत्र्या सानपाडावासियांशी संवाद साधला. यावेळी अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अखिल सानपाडा रहिवासी महासंघ यांच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आणि महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर आम्ही योग्य निर्णय घऊन त्यासंबंधीचा अहवाल न्यायालयात सादर करु, असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जी यांनी दिले. यानंतर सानपाडा बंद आंदोलन मागे घण्यात आले. यावेळी ‘अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान’ आणि ‘अखिल सानपाडा रहिवासी महासंघ’चे अध्यक्ष कैलास ताजणे, पदाधिकारी घनश्याम पाटे, अजय मोडपे, अजय पवार, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, दिलीप बोऱ्हाडे, माजी नगरसेविका सौ. कोमल वास्कर, सौ. संगिता बोऱ्हाडे, आदि उपस्थित होते. तर महापालिकेचे तुभे विभाग सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मध्यस्थीनंतर पदाधिकाऱ्यांनी पुकारलेले उपोषण आंदोलनही स्थगित करण्यात आले.
सदर आंदोलनाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, ‘भाजपा’चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, ‘मनसे’चे शहर अध्यक्ष गजानन काळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, मनोज हळदणकर, मिलिंद सुर्यराव,
दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सानपाडा बंद आंदोलनाला पाठिंबा दिला. तर आंदोलनाचे नेतृत्व दरम्यान, ‘सिडको’ने याठिकाणी रहिवासी सोसायट्यांसाठी भूखंड आणि घरे
उपलब्ध केल्यामुळे आम्ही सानपाडा विभागात रहावयास आलो. आम्ही रहात असलेल्या शेजारीच नवभारत प्रेस जवळ असलेला भूखंड यापूर्वी प्रेस साठी ‘सिडको’ने राखीव ठेवला होता. परंतु, ‘सिडको’च्या तत्कालीन अध्यक्ष आणि
व्यवस्थापकीय संचालकांनी या प्लॉटवर आरक्षण उठवितानाच त्यावरील काही भाग एका विशिष्ट धर्मासाठी वाटप केला. मुळातच सानपाडा विभाग हिंदु बहुल भाग असल्याने या विभागात इतर धर्मासाठी भूखंड वाटप करुन ‘सिडको’ने
नागरिकांच्या धार्मिक भावना भडकावण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही स्थानिक रहिवाशांनी या भूखंड वाटपाला विरोध करुन सदर धार्मिक संस्थेला इतरत्र भूखंड वाटप करावा, अशी मागणी केली आहे. त्याअनुषंगाने आमचे गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरु आहे. शासन आणि सिडकोने घतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे निषेध मोर्चे काढून देखील आपल्याला न्याय मिळत नाही. त्यातच उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथील मंदिरात धार्मिक घोषणा देऊन घुसण्याचा प्रयत्न करणारा आणि तेथील दोन पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या अहमद मुर्तुझा अब्बासी या तरुणाकडे सापडलेल्या आधारकार्ड आणि पॅनकार्डवर सानपाडा येथील मिलेनियम टॉवरचा पत्ता असल्याने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. त्यामुळे अशा या देशविघातक प्रकत्तींपासून सानपाडा विभागाला वाचवण्यासाठी सानपाडा विभागात बंद पाळून महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केल्याची माहिती . दरम्यान, या आंदोलनातून सानपाडा विभागातील शाळा-कॉलेज सह इतर शैक्षणिक संस्था, अत्यावश्यक सेवेतील वाहने, ॲम्ब्युलन्स, दुधाची गाडी, स्कुल व्हॅन, आदिंना अटकाव करण्यात येणार नस्न इतर सर्व व्यवहार बंद राहतील, असे ‘अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान’चे अध्यक्ष कैलास ताजणे यांनी सांगितले.