कोपरी गाव गावदेवीचा वार्षीक उत्सव भक्तीभावात साजरा

नवी मुंबई-:सध्या चैत्र महिन्यात गावोगावी गावदेवीच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. तसेच या जत्रा प्रत्येक गावातील ग्रामस्थ आपापल्या परंपरा आणि रूढी नुसार साजऱ्या करत आहेत. मात्र कोपरी गावात जत्रे ऐवजी गावदेवीचा वार्षिकोस्तव साजरा करण्याची परंपरा आहे. मांसाहाराला बगल देत सत्यनारायणाची पूजा करून मोठ्या हर्षोउल्हासात कोपरी गावातील गावदेवीचा उत्सव जत्रे प्रमाणेच वार्षिक उत्सव साजरा करण्याचा पायंडा ग्रामस्थांनी पाडला आहे.

कोपरी गाव गावदेवीला सुमारे २०० वर्षा पेक्षा जास्त वर्ष झाल्याचे गावातील जेष्ट नागरिक सांगतात. गावात साधरणतः ७० ते ७५ वर्षा पूर्वी गावदेवीची जत्रा भरत असे. मात्र जत्रेच्या दिवशी वाद विवाद होण्यास लागले म्हणून ग्रामस्थांनी गावदेवीची जत्रा भरवीण्याची परंपरा बंद केली. त्यानंतर ग्रामस्थांनी लोक सहभागातुन पंधरा वर्षापूर्वी नवीन मंदिर बनविले. त्यांनतर पुन्हा २००८ साली पुन्हा मंदिराचे काम करून मंदिरात देवीची पूर्णाकृती मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली व सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. मूर्तीची प्रतिष्ठापणा केल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून ग्रामस्थांनी गावदेवीचा यात्रे प्रमाणेच वार्षिकोस्तव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.व तेव्हा पासून चैत्र महिन्यात  कोपरी गावात देवीचा वार्षिक उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी सत्यनारायणाची पूजा घातली जाते आणि सोडत पद्धतीने त्याचे नाव चिट्ठीत येते त्या दाम्पत्यांस पूजेला बसण्याचा मान मिळतो. प्रत्येक गावात जत्रेच्या पूर्व संधेला गावदेवीची पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मात्र कोपरी गावात पालखी ऐवजी देवीचा जागरण केला जातो. त्यात गावदेवीची गाणी (बायांची गाणी) आयोजन असते. यात गावदेवी गाणी म्हटली जातात जागरण केले जाते.व या वेळी गावातील सर्व महिला व ग्रामस्थ हजर असतात.मुख्य दिवशी पूजेचा मान मिळालेल्या दाम्पत्यांच्या हस्ते पूजा केली जाते.ब देवीला गोडाचे नैवद्य दाखविले जाते.त्यात प्रामुख्याने तांदळाच्या पिठापासून बनविलेल्या पिठी नैवद्याचा समावेश असतो. पूजा संपल्यानंतर सर्व ग्रामस्थ देवीचा दर्शन घेतात व सायंकाळी गावदेवीचा भंडारा जेवण जेवन ग्रामस्थ एकत्र करतात.अशा प्रकारे कोपरी गावातील गावदेवीचा जत्रे प्रमाणेच वार्षिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने गावकरी साजरा करण्यात आला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सानपाडा बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद; आस्थापने, दुकाने १०० टक्के बंद