7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नमुंमपा “कोव्हीड योध्द्यांचा” सन्मान
नवी मुंबई : जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगातील सर्वच लोकांच्या केवळ आरोग्यविषयक रोग व त्यावरील उपाय यांच्या कडे लक्ष न पुरवणे तर त्यांच्या शारीरिक व मानसिक, व सामाजिक आरोग्याचाही विचार करून त्यांना योग्य ते उपचार करणे व त्यांना मदत करणे हे आरोग्य संघटनेचे प्रमुख कार्य आहे. WHO युनोची एक शाखा आहे. त्यामध्ये जगातील 192 देशांनी मिळून जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संमेलन घेतले. या संमेलनात जनतेच्या आरोग्य समस्या सर्वांनी मिळून सोडवाव्यात असे ठरविण्यात आले. विभिन्न वंशांच्या लोकांच्या समस्या वेगळ्या असल्या तरी सर्व मानवाच्या आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानुसार 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य संघटनेचे सन 2022 या वर्षाचे घोषवाक्य हे “Our Planet Our Health” असे आहे. कोव्हीड 19 साथरोग कालावधीत कर्तव्य बजावलेल्या टास्क फोर्स सदस्य, वैद्यकीय अधिकारी व निम्नवैद्यकीय कर्मचारी यांनी नवी मुंबई महानगरपालिकेला संमर्पित भावनेने सेवा देवून कर्तव्य बजावले आहे. नवी मुंबई महानगरपालिके तर्फे दि.07 एप्रिल 2022 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, टास्क फोर्स सदस्य, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, नोडल अधिकारी, आरोग्य विभाग (मुख्यालय) वैद्यकीय अधिकारी तसेच निम्न वैद्यकीय कर्मचारी यांचा “कोव्हीड योद्धा” म्हणुन सन्मान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने त्यांना यथोचित सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम हा दि. 7 एप्रिल 2022 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे दुपारी 2 ते 7 या वेळेत संपन्न होणार आहे. यामध्ये टास्क फोर्स सदस्य, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, नोडल अधिकारी, आरोग्य विभाग (मुख्यालय) वैद्यकीय अधिकारी तसेच निम्न वैद्यकीय कर्मचारी यांचा “कोव्हीड योद्धा” म्हणुन सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.