प्रतिनिधी - आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथीलशिवाजी मैदान चैत्रनवरात्रोत्सव २०२२ भक्ती व कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रास गरबा रंगला या दांडिया रास गरब्यासाठी गुजराती समाजातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता. तसेच देवीच्या दर्शनासाठी गुजराती समाजाचे महाराज वैष्णवाचार्य पु. पा. गो. १०८ श्री. द्रुमील कुमारजी महोदयजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सत्कार मूर्ती ठाणा हलाई लोहाना समाजाचे रमणभाई छगनलाल ठक्कर, ठाणा कच्छी कडवा पाटीदार समाजाचेखराशंकर धनजी जब्बूंआणी, ठाणा के व्ही ओ डी जैन समाजाचे सौ. रिटा रमेश पोलाडीया, ठाणा आचलगच्चा जैन समाजाचे मनिष पोपटलाल शहा, ठाणा वर्धमान स्थानकवासी जैन समाजाचे रमेश रतनसी छेडा, ठाणा राजस्थान जैन समाजाचे ललित जयलालजी राठोड, ठाणा कपोळ समाजाचे विलेस द्वारकादास संघवी, नवी मुंबईचे वाशी कच्ची जैन समाजाचे भूपेंद्र शाह, वासी लोहाना सेवा समाजाचे धर्मेंद्रजी कारीया,कच्ची वागड लेवा पाटीदार समाजाचे विरल भाई पटेल, मिरा भाईंदर गुजराथी समाजाचे सी. बी. मोदी, मीरा रोड कच्च संघाचे जयेश गडा, भाईंदर लोहाना सेवा समाज मिरा रोड डॉ. नयना वसानी, भाईंदर जैन समाजाचेप्रकाश हमीरलालजी जैन, डॉ. हितेश संघवी यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी आयोजक राजन विचारे, नगरसेविका नंदिनी विचारे, तसेच गुजराती जैन व मारवाडी समाजासाठी काम करणारे भरत मेहता, कन्नूभाई रावल, सुरेश गडा, महेश ठक्कर, व इतर मान्यवर उपस्थित होते.