नवीमुंबईकरांसाठी पोस्टाची 24 तास सेवा

नवी मुंबई :-नवी मुंबई विभागातील नागरिकांच्या सुविधेसाठी नवी मुंबई डाक विभागामार्फत 24 तास स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्ट बुकिंग सुविधा दि.1 एप्रिल 2022 पासून वाशी डाक व्यवसाय केंद्र, वाशी मुख्य डाकघर, सेक्टर-16अ, अग्निशक केंद्राच्या मागे, वाशी, नवी मुंबई येथे सुरु करण्यात आली आहे.

स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्ट सुविधा सर्वांसाठी आणि आठवड्यातील सर्व दिवस 24 तास उपलब्ध आहे. या सुविधेचे उद्घाटन नवी मुंबई क्षेत्र, पनवेल पोस्टल सर्विसेस विभागाच्या डायरेक्टर शरण्या यु. यांच्या हस्ते करण्यात आले. नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी दिवसा किंवा रात्री त्यांच्या सोयीच्या वेळी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक, डाकघर नवी मुंबई विभाग, वाशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरूळमधील गटारांची तळापासून सफाई करा : गणेश भगत