आ. रमेश पाटील यांची भारत सरकारच्या नॅशनल फिशरीस डेव्हलपमेंट बोर्डाच्या सदस्य पदी वर्णी
नवी मुंबई: नवी मुंबई शहराचे सुपूत्र व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,भाजपचे आमदार रमेश पाटील यांची भारत सरकारच्या नॅशनल फिशरीस डेव्हलपमेंट बोर्डाच्या सदस्य पदी महाराष्ट्र राज्यातून एकमेव निवड करण्यात आली आहे. आमदार पाटील यांच्या निवडीने नवी मुंबई शहरात त्यांचे अभिनंदन होत आहे.
आमदार रमेश पाटील कोळी महासंघाच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचे मागील अनेक वर्षापासून नेतृत्व करीत आहेत. तसेच मागील पाच वर्षांपासून राज्यावर आलेल्या चक्री वादळाचा तढाका बसला. त्यावेळी त्यांनी मच्छीमारांना मदतीचा हात देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जीवाचे रान केले. तसेच विधिमंडळात देखील वेळोवेळी आवाज उठवला. त्यामुळे त्यांची निवड म्हणजे ख-या अर्थाने कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचा सन्मान असून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मच्छिमार बांधवांना भेट मिळाली असल्याचे मत प्रवाह व्यक्त होत आहे.
कोळी महासंघ नेहमीच कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांच्या उन्नतीकरिता प्रयत्न करत असून यापुढील काळातही नॅशनल फिशरीस डेव्हलपमेंट बोर्डाच्यामाध्यमातून विविध योजनांचा लाभ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील मच्छिमार बांधवांना मिळवून दिला जाईल. तसेच त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जातील.
आमदार रमेश पाटील,विधानपरिषद,राज्य.