प्रा. अरुण घाग यांना आंतरराज्य आदर्श प्राचार्य गौरव पुरस्काराने सन्मानित
उरण : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेज जासई चे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण शंकर घाग यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन चा मानाचा समजला जाणारा आंतरराज्य आदर्श प्राचार्य गौरव पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले आहे. गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील निवडक व्यक्तींची निवड आंतरराज्य पुरस्कार वितरण समितीने करून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. कर्नाटकातील बेळगाव- चिक्कोडी येथे भारताच्या मा. केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनुर व बेळगावचे खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे जेष्ठ सदस्य, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी अरुण घाग यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्यावेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस, कामगार नेते सुरेश पाटील,मधुकर पाटील, रयत सेवक संघाचे समन्वयक .नुरा शेख, संतोष ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.