घणसोलीत नववर्षानिमित्त शोभा यात्रेचं आयोजन

घणसोली:- गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी घणसोली विभागातील आधार जेष्ठ नागरिक सेवा संघ व शिवसेना विभाग घणसोली यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षानिमित्त शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.घणसोलीत मनमोहन मिठाईवाला या शॉप समोरील चौकातून लेझीम पथक आणि टाळ मृदुंगाच्या तालात पारंपरिक पद्धतीने या शोभा यात्रेला सुरुवात झाली.

 

सदर चौकात हिंदूरिती रिवाजानुसार गुढी उभारुन प्रभू श्री रामांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पाटण तालुक्यातील वाल्मिकी लेझीम पथकाच्या सुंदर नृत्याने व माऊली भजनी मंडळाच्या सुमधुर अभंग वाणीने या शोभायात्रेत चैतन्यमय रंग भरले.या शोभायात्रेचं घणसोलीतील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.या शोभायात्रेत तरुणांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

दरम्यान या शोभायात्रेला शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई शिवसेना महिला संघटक रंजना शिंत्रे, शहरसंघटक शितल कचरे,उपशहरप्रमुख सुरेश सकपाळ, उपशहरप्रमुख सुर्यकांत मढवी,स्थानिक शिवसेना नगरसेविका दिपाली सकपाळ, शिवसेना विभागप्रमुख,अशोक राऊत, भरत चव्हाण, उपविभागप्रमुख व आधार जेष्ठ नागरिक सेवा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राजुशेठ गावडे, युवासेनेचे घणसोली समन्वयक प्रविण वाघराळकर, विभागधिकारी सागर घोडके,सचिन आसबे, सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेना,महिला आघाडी, व नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केंद्र सरकारच्या महागाईचा निषेध करीत युवासेनेने घातले दुचाकीचे श्राद्ध