माथाडी नेते नरेन्द्र पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड
नवी मुंबई-: ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन’चे सरचिटणीस ,माथाडी नेते व माजी आमदार नरेन्द्र पाटील यांची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
माथाडी कामगार नेते नरेन्द्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या न्यायहक्कासाठी अनेक आंदोलने केली आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून देखील ते आग्रही असुन मराठा आंदोलनात पाटील यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे.राज्यात २०१४ साली देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सेना भाजप पक्षाचे सरकार आल्यानंतर ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ला पुनर्जिवीत करुन या ‘महामंडळ’च्या अध्यक्षपदी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.अध्यक्ष या नात्याने मराठा समाजातील युवकांना उद्योजक करण्यासाठी परिश्रम घेतले. कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांना शासनाच्या माथाडी ॲक्ट, १९६९ आणि त्यान्वये स्थापन झालेल्या माथाडी बोर्डाच्या योजनेचे संरक्षण मिळवून देण्यासाठी माथाडी संघटनेचे सरचिटणीस पदाची धुरा सांभाळून नरेंद्र पाटील यांनी ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’च्या योजनेचा लाभ युवकांंना मिळण्यासाठी कार्य केले आहे.देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून देखील पाटील यांची ओळख आहे.आणि त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतिय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नरेन्द्र पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.