स्वच्छ भारत अभियान निमित्ताने शहर  झाले बॅनर मुक्त

नवी मुंबई-:स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेनिमित्त शहरात पाहणीसाठी केंद्रीय प्रहक फिरत असल्याने स्वच्छतेत बाधा आणणाऱ्या शहरातील अनधिकृत बॅनर वर मनपाच्या वतीने  कारवाई करत शहर बॅनर मुक्त केले असल्याने शहरातील चौक मोकळा श्वास घेत आहे. मात्र सदर कारवाई ही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेनिमित्त तात्पुरती न ठेवता कायम ठेवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

केंद्र सरकार वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ शहरांसाठी स्पर्धा भरवली जाते. आणि या स्पर्धेत नवी मुंबई शहराचा  प्रथम क्रमांक यावा म्हणून मनपा प्रशासनाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यासाठी शहरात रंगकाम व जत्रा कामांवर करोडो रुपयांची कामे केली जातात.सदर कामे करताना साफसफाई वर देखील कटाक्षाने भर दिला जातो.मात्र मनपा सफाई कामगार शहर स्वच्छ ठेवत असले तरी काही बॅनर बाज शहरात अवैध बॅनर लावून  शहर विद्रुप करत स्वच्छतेत बाधा आणत असतात. अशा अवैध बॅनर बाजांवर कारवाई करावी म्हणून मनपा आयुक्त वाघाच्या डरकाळी प्रमाणे आदेश देतात .मात्र यातील बहुतांश बॅनर हे राजकीय नेत्यांचे असल्याने वाघाची डरकाळी लगेच  मांजराच्या आवाजात रूपांतर होते. त्यामुळे अशा बॅनर बाजांवर कारवाई होताना दिसत नाही. मात्र सध्या स्वच्छ भारत अभियान निमित्ताने केंद्रीय पथक शहरात तपासणी करत आहे. त्यामुळे अशा अवैध बॅनर मुळे स्वच्छतेत बाधा येऊन नामांकनात घसरण होऊ शकते. त्यामुळे अशा बॅनर वर कारवाई करण्याचा सपाटा मनपाने लावला आहे.त्यामुळे सदर कारवाईमुळे शहरातील चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. मात्र सदर कारवाई ही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेनिमित्त तात्पुरती न ठेवता कायमस्वरूपी ठेवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक जाधव यांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

10 एप्रिल रोजी पनवेलमध्ये वीरशैव लिंगायत समाजाचा वधु-वर मेळावा