10 एप्रिल रोजी पनवेलमध्ये वीरशैव लिंगायत समाजाचा वधु-वर मेळावा
उरण : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र वीरशैव सभा रायगड जिल्हयाच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजातील इच्छुक वधुवरांसाठी रविवार दि 10 एप्रिल 2022 रोजी कर्नाटक संघ हॉल, शांती निकेतन शाळेजवळ,सेक्टर 2,शबरी हॉटेल समोर, न्यू पनवेल येथे वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वीरशैव लिंगायत समाजातील सर्व जाती पोटजातीतील तसेच जंगम समाजातील बंधु भगिनींणी आपल्या उपवर मुला/मुलींसोबत हजर रहावे. कार्यक्रमाची नोंदणी 11 ते 1 या वेळेत मेळाव्याच्या ठिकाणीच होईल. व लगेचच दुपारी 2 वाजता मेळावा सुरु होईल. यासाठी कोणतेही प्रवेश फि नाही. अधिक माहितीसाठी अध्यक्ष महेंद्र बोडके-9822346852,नितिन वाणी-सेक्रेटरी 9325255611,मंगलाताई बिराजदार-9920156144,रेखाताई कोरे-9923386642 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन अध्यक्ष महेंद्र बोडके यांनी केले आहे.