नवी मुंबईत विद्युत वाहने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला

नवी मुंबई-:एकीकडे वाढते इंधन दर आणि या इंधनापासून होणारा वायू प्रदूषण म्हणून आता पर्यावरण पूरक विद्युत वाहनांचा पर्याय समोर आला असून नवी मुंबई शहरात या विद्युत वाहनांना अधिक पसंती दिली जात आहे.नवी मुंबई शहरात  वर्षभरात उपप्रादेशिक परिवहनाकडे शहरात एकूण ८२४ विद्युत वाहनांची नोंदणी झाली आहे. 

 आजच्या वाढत्या इंधन दरवाढीवर मात करीत भारतात विद्युत वाहने चालविण्यावर अधिक भर देण्याच्या दृष्टीने अनेक ऑटोमोबाईल कंपनीने विद्युत वाहन निर्मितवर जोर वाढीविला असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र असे आसताना त्यासाठी लागणारी चार्जिंग स्टेशनचा अभाव आहे. दिवसेंदिवस इंधन दरवाढीचा आलेख चढताच आहे. त्यामुळे इंधनावर चालणारी वाहने चालविणे आवाक्याबाहेर जात आहे. तसेच पर्यावरण पूरक निर्मितीवर भर दिला जात आहे. इंधन बचत आणि पर्यावरणपूरक हेतू साध्य करण्यासाठी विद्युत वाहने निर्मिती ही वाढत आहे. इंधन वाहनांना विद्युत वाहनांचा  चांगला पर्याय उपलब्ध होत आहे. नवी मुंबई शहरात ५०% विद्युत वाहन खरेदीसाठी कल वाढला आहे. या वर्षी एप्रिल २०२१ पासून ते आतापर्यंत आरटीओकडे  ८२४ विद्युत वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये दुचाकीचे ४९२ प्रमाण जास्त आहे. त्यांनतर चारचाकी २०६ आणि  ११५  बसेचची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छ भारत अभियान निमित्ताने शहर  झाले बॅनर मुक्त