ठाणे जिल्ह्यात 7 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

ठाणे ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अंतर्गत असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये तसेच कौटुंबिक न्यायालयकामगार न्यायालयसहकार न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये शनिवारदि. 07 मे2022 रोजी सकाळी 10.30 वाजता "राष्ट्रीय लोकअदालत" आयोजित केली आहे. जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांचेकडे अर्ज करावाअसे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी केले आहे.

            या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये  मा. न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे जी दिवाणी स्वरूपाचीतडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाचीवैवाहिक स्वरूपाची138 एन. आय. अॅक्ट (चेक संबंधीची) अन्वये दाखल झालेली प्रकरणेबॅक वसूली प्रकरणेमोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणेकौटुंबिक वाद प्रकरणेकामगार विषयक वादभूसंपादन प्रकरणेविज व पाणी विषयक देयक प्रकरणेमहसूली प्रकरणे तसेच दावा दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

            राष्ट्रीय लोकअदालतीबाबत कोणतीही समस्या असेल व कोणतीही चौकशी करायची असल्यास त्यांनी तालुका विधी सेवा समिती वाशीनवी मुंबईजि. ठाणे दूरध्वनी क्र. 022-27580082भिवंडीजिल्हा ठाणे दूरध्वनी क्र. 02522-250828कल्याणजि. ठाणे दूरध्वनी क्र.0251-2205770मुरबाडजिल्हा ठाणे दूरध्वनी क्र.02524-222433शहापुरजिल्हा ठाणे दूरध्वनी क्र.02527-270776उल्हासनगरजिल्हा ठाणे दूरध्वनी क्र. 0251-2560388पालघर जिल्हा पालघर दूरध्वनी क्र.02525-256754वसईजिल्हा पालघर दूरध्वनी क्र.0250-2325485वाडाजिल्हा पालघर दूरध्वनी क्र.02526-272672डहाणुजिल्हा पालघर दूरध्वनी क्र.02528-222160 व  जव्हारजिल्हा पालघर दूरध्वनी क्र.02520-222565 या क्रमांकावर संपर्क साधावा.

            अथवा सचिवजिल्हा विधी सेवा प्राधिकरणन्याय सेवा सदनपहिला मजलाजिल्हा न्यायालय परिसरठाणे येथे प्रत्यक्ष येवून किंवा फोन नंबर 022-25476441व्दारे संपर्क साधावा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे राष्ट्रीय स्मारक होईल - अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात