घणसोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वाचवा

नवी मुंबई-:घणसोली सेकटर १२ मधील नियोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या भुखंडावर खाजगी विकसकाकडुन काम सुरू असून यावेळी मोठ्या प्रमाणात कांदळवने, वृक्ष, झाडे, झुडपे आणि जैवसंपदा नष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आगरीकोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

घणसोली सेक्टर १२ येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा संकुलासाठी भुखंड आरक्षित आहे त्यावर सिडकोच्या माध्यमातून अधिकारांचा गैरवापर करून वसवण्यात आलेला आहे. तसेच मुळात सदरचे प्रकरण न्याय प्रविष्ट असून महानगरपालिकेने कोणत्याही पद्धतीची बांधकाम परवानगी सदर भूखंडावर दिलेली नसताना सदर भूखंडावर असलेले कांदळवने, वृक्ष, झाडे, झुडपे आणि जैवसंपदा नष्ट करण्यात आलेली असून, फ्लेमिंगो विहार करणारी पाणथळ सुद्धा बुजवण्यात आलेली आहे, त्यमुळे सदर बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या दोषी विकासक, कंत्राटदार, वास्तुशिल्पकार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यावर मनपा आयुक्तांनी सदर प्रकरणी कोणी दोषी आढळ्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासित केले. यावेळी आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सी ए निलेश पाटील, बेलापूर विधानसभा अध्यक्ष अविनाश सुतार, ऐरोली विधानसभा अध्यक्ष संदीप(सॅन्डी) पाटील, आणि ऐरोली विधानसभा उपाध्यक्ष अनिकेत पाटील उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यासाठी एमआयडीसी सुनावणी