सपोनि सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया व मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड
नवी मुंबई : भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन व हिमाचल प्रदेश बॉडीबिल्डिंग फेडरेशन यांच्यावतीने (पोवंटा साहिब )हिमाचल प्रदेश या ठिकाणी भारतीय बॉडीबिल्डिंग संघ निवड चाचणी घेण्यात आली. यात महामार्ग पोलिस विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांची 80 किलो वजनी गटामध्ये भारतीय संघात निवड करण्यात आली. मि.अशिया 2022 हि स्पर्धा दि.15 ते 21 जुलै दरम्यान मालदीव या ठिकाणी होणार आहे तर 06 ते 12 डिसेंबर दरम्यान मि. वर्ल्ड ही स्पर्धा (फुकेत) थायलंड या ठिकाणी होणार आहे.
या स्पर्धेसाठी सुभाष पुजारी हे नेरुळ येथील वन अबोव्ह जिम व वाशी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खेळाडु मिस्टर युनिव्हर्स सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज 5 तास सराव करत आहेत. यापूर्वी त्यांनी ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळविले आहे. तसेच सलग दोनवेळा मास्टर भारतश्री व मास्टर महाराष्ट्र श्री हा किताब सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे.
1 मे रोजी पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. सदरच्या निवडी बद्दल त्यांना पत्नी रागिणी पुजारी ,चेतन पाठारे वर्ल्ड बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी तसेच विक्रम रोठे वर्ल्ड बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे लिगल अँडव्हायझर यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, पोलिस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय, विनय कारगांवकर अफ्पर पोलिस महासंचालक अनुपकुमार सिंह अफ्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य जय जाधव, अफ्पर पोलीस आयुक्त नवी मुंबई, संजय जाधव पोलिस अधीक्षक महामार्ग पुणे विभाग, परेश ठाकूर सभागृह नेता पनवेल महापालिका, प्रीतम म्हात्रे विरोधी पक्षनेता पनवेल महापालिका तसेच पोलीस खात्यातील त्यांचे सहकारी मित्र सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.