एपीएमसी फळ बाजार चेरी हंगामाला सुरुवात
नवी मुंबई-:वाशीतील एपीएएमी बाजारात हापूस आंब्याचा हंगाम उत्तरार्धाकडे आला असताना आता बाजारात इतर फळांच्या हंगामाला सुरुवात होत आहे . यामध्ये इतर फळांची आवक होण्यास सुरुवात झाली असुन बाजारात लालेलाल चेरी या फळांची आवक होण्यास सुरुवात झाली आहे.
मे महिना अखेरपर्यंत हा हापूसचा हंगाम संपतो. बाजारात आता इतर फळांच्या आवकीला सुरवात झाली आहे . मे अखेरपर्यंत बाजारात चेरी ही फळे दाखल होण्यास सुरुवात होत असते. चेरीची आवक ५ जून नंतर आवक वाढेल असे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत. चेरी हे उष्ण वातावरणात लवकर खराब होतात, काश्मीर, शिमला आणि हिमाचल प्रदेशात चेरीचे पीक घेतले जाते. त्यामुळे रस्ते वाहतूकीने फळे बाजारात येण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी जातो, त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता जास्त असते म्हणून या फळांच्या वाहतूक करिता रेल्वे आणि हवाई वाहतुक केली जाते. काश्मीर, शिमला आणि हिमाचल प्रदेशातील दाखल होणाऱ्या चेरीला प्रतिकिलो ८०-२०० बाजारभाव असून चेरीचा हंगाम जून अखेरपर्यंत राहतो.