इनरव्हील क्लब पनवेल सिटीच्या अध्यक्षपदी हेतल जितेंद्र बालड

पनवेल : इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी या नुतन क्लबचा पदग्रहण समारंभ आणि सनद प्रदान सोहळा पनवेल जिमखाना येथे शनिवारी (30 एप्रिल) थाटात संपन्न झाला. समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणुन इनरव्हील डिस्ट्रीक्ट 313 च्या जिल्हाध्यक्षा संतोष सिंग तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सचिव डॉ. शोभना पालेकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि गणेश वंदनेने झाली. इनरव्हील क्लब पनवेल सिटीच्या संस्थापक अध्यक्षपदी सर्वानुमते हेतल जितेंद्र बालड यांची तर सचिवपदी गिरा चौहान, उपाध्यक्षपदी ध्वनी तन्ना, खजिनदारपदी वैशाली कटारिया, मिनी राजपूत आय.एस.ओ., बिजल मिराणी संपादकपदी, ममता ठक्कर क्लब करसपॉन्डंट, तर वैशाली ठक्कर यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नूतन अध्यक्षा हेतल बालड यांना सनद आणि कॉलर टाळ्यांच्या गजरात सूपूर्द करण्यात आली.  संपादक बिजल मिराणी यांनी संपादीत केलेल्या उर्जा या क्लब बुलेटीनचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. क्लबच्या या स्थापनादिनाचे औचित्य साधून क्लब तर्फे ज्ञानदीप फाऊंडेशन या अनाथआश्रमाला किराणा सामान देण्यात आले.

नव्याने स्थापन झालेल्या या इनरव्हील क्लब पनवेल सिटीचा पालक क्लब इनरव्हील क्लब न्यू पनवेल हा आहे. इनरव्हील क्लब न्यू पनवेलच्या अध्यक्षा स्मृती बिश्‍वास यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर सचिव शिल्पा राजपूत या कार्यक्रमासाठी एम.ओ. सी. होत्या. झोनल सब को-ऑडीनेटर आणि इतर इनरव्हील क्लब आणि रोटेरियन्सनी कार्यक्रमास उपस्थित राहून नवीन टिमचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. नूतन इनरव्हील क्लब पनवेल सिटीच्या उपाध्यक्षा ध्वनी तन्ना यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील विकास कामांचा आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडून प्रत्यक्ष आढावा