वाशीतील मधुबन लेडीज बारवर कारवाई, 12 बारबालासह 18 जण ताब्यात
नवी मुंबई : गुन्हे शाखा व वाशी पोलिसांनी संयुक्तरीत्या वाशीतील मधुबन या लेडीज बारवर सोमवारी मध्यरात्री छापा मारुन सदर बारमध्ये काम करणा-या 12 महिला वेटरसह एकुण 18 जणांना ताब्यात घेतले आहे. सदर बार मधील महिला या ग्राहकांसोबत अश्लील हावभाव व अंगविक्षेप करताना आढळुन आल्याने पोलिसांनी सदरची कारवाई केली.
वाशी सेक्टर-17 मधील मधुबन या लेडीज बारमध्ये काम करणाऱया महिला ग्राहकांसोबत अश्लिल चाळे व हावभाव करुन अश्लिल वर्तन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्ष तसेच युनिट-3 च्या पथकाने वाशी पोलिसांच्या मदतीने सोमवारी मध्यरात्री वाशी सेक्टर-17 मधील मधुबन बारवर छापा मारला. यावेळी सदर बारमध्ये काम करणाऱया महिला ग्राहकांसोबत अश्लिल चाळे व हावभाव करुन अश्लिल वर्तन करत असल्याचे तसेच बारचा मॅनेजर व वेटर त्यांना प्रोत्साहन देताना आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी 12 महिला वेटर व बारचा मॅनेजर आणि वेटर अशा एकुण 18 जणांना ताब्यात घेतले. तसेच या सर्वांवर वाशी पोलीस ठाण्यात कलम 294 नुसार गुन्हा दाखल केला आहे.