अक्षय तृतीयाला खारघर मध्ये सोने खरेदीसाठी गर्दी
खारघर: अक्षय तृतीया हा साडेतीन मूहूर्तापैकी एक समजला जातो. या दिवशी सोने खरेदीला प्राधान्य दिले जातात. अक्षय्यतृतीया आणि सोने खरेदी साठी सराफ दुकानात गर्दी केली होती. दुकानात होणारी गर्दी पाहून जवळपास दोन ते अडीच कोटी रू. उलाढाल होईल असे एका ज्वेलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
खारघरच्या विकासात ज्या प्रमाणे भर पडत आहे.त्या प्रमाणे लोकसंख्येत भर पडत आहे. खारघर परिसरात पन्नासहून अधिक सराफांची दुकाने आहेत. महाराष्ट्रीयन व्यक्ती साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया दिवशी सोने खरेदीस प्राधान्य दिले जाते असल्यामुळे अक्षय तृतीयेच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठ सज्ज झाल्या होत्या. त्यात गेल्या काही दिवसापासून सोन्याचा भावात घट झाल्याचे बातम्या तसेच सोशल मीडियावरून माहिती माहिती मिळत . तसेच मे महिन्यात लग्न सराई प्रमाण जास्त असल्यामुळे अनेकांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त निवडला होता. त्यामुळे काही दुकानात नातेवाईक समवेत तरुण तरुणी दिसून आले. त्यात 22 कॅरेट-सोन्याचे भाव ( प्रति 10 ग्रॅम) 49540 रुपये असल्याचे सांगितले. गेले वर्षे कोरोना काळात व्यवसायावर परिणाम झाला होता. मात्र यावर्षी खरेदीदाराकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे काही दुकानदारांनी सांगितले. सोने खरेदी बरोबरच साडेतीन मुहूर्तांपेकी एक असलेल्या या सणाच्या निमित्ताने वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी साठी शोरूम आणि मॉल मध्ये गर्दी दिसून आली.
कोट - गेले दोन वर्षे कोरोनामुळे सराफा व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. मात्र या वर्षी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसापासून सोन्याचा भावात घट झाली आहे. खारघर मध्ये पन्नासहून अधिक ज्वेलर्सचे दुकान असून अक्षय तृतीयाला खारघर मध्ये सराफा बाजारपेठांमध्ये जवळपास दोन ते अडीच कोटी रुपये उलाढाल होईल असे वाटते. - प्रकाश कुमार प्रजापती, अध्यक्ष ,खारघर ज्वेलर्स वेल्फेअर असोसिएशन