कामगार दिनी कामगारांचा सन्मान

नवी मुंबई-: श्रमाला लाभो ' मोल सर्वदा, अन् घामाला मिळो दाम,या हातांना मिळो काम, अन् कामाला मिळो सन्मान ' या ब्रिदवाक्याला अनुसरून  १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र राज्य नामदेव भगत यांच्या माध्यमातून  'कामगार सन्मान २०२२' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांतर्गत ६० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कपड्यांचे जोड-भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले. 

" स्वच्छता कर्मचाऱ्यांचा करोना काळा मधील काम अतिशय स्तुत्य व महत्वाचे होते. त्याने आपले जीवन धोक्यात घालून नागरीकांसाठी कार्य केले व त्याचप्रमाणे नवी मुंबई शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे ", असे प्रतिपादन भगत यांनी केले. यावेळी एन.आर.बी. स्कूलचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य व शिक्षक वृंद उपस्थित होते. तसेच स्वच्छता कर्मचारी व इतर प्रभागातील,  ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित  होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन