खाद्य तेलाच्या दरात २५% ते ३०% दरवाढ
नवी मुंबई-: मागील २ महिन्यांपासून युक्रेन-रशिया युद्धामुळे तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तसेच दिवसेंदिवस वाढत्या इंधन दरवाढीने ही वाहतुकीचा खर्च वाढल्याने २५%-३०% दरवाढ झाली आहे. मागील आठवड्यात १५ लीटर सूर्यफूल तेल २८००-२९००वरून ३ हजारांवर पोचले आहे. तर इंडोनेशियाने देखील तेलाची निर्यात थांबवल्याने आगामी काळात भारतात तेलाचा आणखी भडका उडणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
मागील दीड वर्षापासून आवाक्यात असणारे खाद्य तेलाचे दर साधारणतः दिवाळी आधी ककडाडले होते. त्यानंतर तेलाचे दर आवाक्यात आले होते. मात्र पुन्हा रशिया युक्रेन युद्धाने तेलाच्या आयातीवर परिणाम झाला.त्यामुळे तेलांच्या दराने उसळी घेतली आहे. मात्र त्यादरम्यान आतापर्यंत खाद्य तेलाच्या दर वाढतच आहेत. देशात सूर्यफूल तेलाला अधिक मागणी आहे. बाजारात ५० गाडी आवक होते,मागणी ही आहे परंतु इंधन दरवाढीने ही दरवाढ होय आहे. पाम तेलाचा ही खप अधिक आहे. युद्धा आधी सूर्यफूल तेल १५ लिटर २३००रु ते २४०० रुपयांवरून मागील आठवड्यात २८००रु ते २९००रु आता ३ हजार रुपयांवर पोचले आहे. पाम तेल आधी १२००रु ते १४००रुपयांवरून मागील आठवड्यात २३०० रु ते २४००रुपये तर आता २५०० रुपयांवर पोचले आहेत.तर आता इंडोनेशिया या देशाने देखिल कच्या तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतात तेलाची आवक घटणार असल्याने तेलाच्या मागणीत वाढ होऊन दरात आणखी भडका उडणार असल्याची शक्यता घाऊक व्यापारी हर्षद देढीया यांनी व्यक्त केली आहे.