उरण : रायगड जिल्हा परिषद शाळा करंजाडे येथे पहिल्या शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला विद्यार्थ्यांसोबत करंजाडे परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. मेळाव्याच्या उद्घाटनापूर्वी मान्यवरांना लेझीमच्या तालावर नाचत विद्यार्थ्यांनी प्रथम मेळाव्याच्या प्रवेशद्वाराजवळ आणले तेथे त्यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रतीमापूजन व दिप प्रज्वलन करुन मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
रायगड जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण हे उत्कृष्ट व मोफत असल्याने या शाळांकडे आत्ता पुन्हा एकदा पालक वळले असून आपल्या विद्यार्थ्यांना राजीप शाळेत प्रवेश घेत आहेत. या नवागत विद्यार्थ्यांसाठी राजिप शाळा करंजाडेने शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला उपस्थित बालकांचे मूकूट व पुष्प देउन स्वागत करण्यात आले.या मेळाव्यात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपले बहुमूल्य मार्गदर्शन केले.तर ईयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळा पूर्व तयारी गीतांवर नृत्य सादर केले. तसेच दालन क्रमांक 1 ते 8 वर सर्व दखलपात्र विद्यार्थ्यांचा परिचय करुन देण्यात आला. शेवटी भेटवस्तू व खावू देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
या मेळाव्याला करंजाडेचे सरपंच रामेश्वर आंग्रे, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कर्ण शेलार, एसएमसी सदस्य भरत राणे, केंद्रप्रमुख सुप्रिया म्हात्रे , मुख्याध्यापिका कल्याणी लोनुष्टे, शिक्षीका गीता राठोड, संध्या कोकाटे, नीता पाटील, उपशिक्षिका विद्या पाटील , ग्रामपंचायत शिक्षिका प्रिया लंभाते, माता पालक, सखी सावित्री समिती सदस्या, सिरवी व्यापारी संघटनेचे सदस्य, आंगणवाडी सेवीका आदी मान्यवर उपस्थित होते.