गणेश नाईक यांच्या अटकपुर्व जामिनावरील सुनावणी येत्या 27 एप्रिल रोजी

नवी मुंबई : भाजपचे ऐरोलीतील आमदार गणोश नाईक यांनी त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱया 48 वर्षीय महिलेला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी तपास अधिकाऱयांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर येत्या 27 एप्रिल रोजी अटकपुर्व जामीनावर निर्णय घेणार असल्याचे ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुफ्ता यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्याचबरोबर नाईक यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाबाबतची सुनावणी देखील शुक्रवारी होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाणे सत्र न्यायालयाने या दोन्ही प्रकरणात नाईक यांना अंतरिम जामीन न दिल्याने तूर्तास तरी नाईक यांच्यावरील अटकेची तलवार कायम आहे.  

आमदार गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशीनशीपमध्ये राहणाऱया एका महिलेने तब्बल 27 वर्षानंतर गणेश नाईक यांनी आपले शारीरीक व लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तसेच गणेश नाईक यांनी रिल्वॉल्वर दाखवुन आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देखील याच महिलेने सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात नाईक यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांच्यावर गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या गुह्यांच्या तपासाला सुरुवात करुन पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी  ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.  

गुरुवारी दुपारी नाईक यांच्या अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.वाय.जाधव यांनी सुनावणीला नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण न्या. गुफ्ता यांच्या न्यायालयात आले. या न्यायालयानेही केवळ रिव्हॉल्व्हरने धमकावल्याप्रकरणाची सुनावणी घेतली. मात्र, सरकारी वकील आणि तपास अधिकारी यांचे या प्रकरणासंदर्भात म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर पुढील निर्णय दिला जाईल. मात्र, त्यांना यात कोणताही अंतरिम जामीन देण्यात आला नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे तूर्तास या दोन्ही प्रकरणांमध्ये नाईक यांच्यावरील अटकेची तलवार कायम आहे.  

रिव्ह़ॅल्वर दाखविणे हा खूप मोठा गुन्हा आहे, त्यामुळे यावर अंतरिम जमीन मिळू नये, अशी मागणी नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱया महिलेच्या वकिलांनी न्यायालयात केली. त्यावर 1993 पासून सदर महिला व नाईक यांचे संबंध होते. यातून त्यांना आपत्यही झाले. परंतू, गेल्या दोन वर्षापासून नाईक यांनी राजकीय पक्ष बदलल्यानंतर नाईक यांच्यावर हे आरोप होत असल्याचा दावा नाईक यांच्या वकीलांनी केला. मात्र, राजकीय पक्षांशी या आरोपांचा काहीही संबंध नसून तब्बल 27 वर्षे सदर महिलेने अन्याय सहन केल्याचे तिच्या वकीलांनी न्यायालयात तसेच माध्यमांशी बोलतांना सांगितले. दरम्यान, दोन वेगवेगळे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर गणेश नाईक भूमीगत झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उलवे येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण