बाजारात बटाट्याची दरवाढ
नवी मुंबई-: वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार आवारात उत्तर प्रदेशमधील रोज बटाट्याची ५० ते ६० गाड्या आवक होत असते. मात्र आता या आवकित घट झाली असून ३५ गाडी आवक होत आहे. आवक घटल्याने दरात वाढ झाली असून १२ रुपयांनी उपलब्ध असलेला बटाटा आता १९ रुपयांवर पोचला आहे.
बाजारात उत्तर प्रदेश, मधून मोठ्या प्रमाणात बटाटा येत असतो. आता बाजारात जुना बटाटा दाखल होत आहे. उन्हामुळे बाजारात बटाट्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याचे दर वधारले आहेत. आठवडाभर बाजारात शेतातील थेट बटाटा दाखल होईल त्यांनतर कोल्ड स्टोरेज मधील बटाटा आवक सुरू होईल व दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती कांदा बटाटा व्यापाऱ्यांनी दिली आहे.