खेळाच्या मैदानात उभारले अनधिकृत राम जानकी मंदीर, नागरिकांमध्ये नाराजी 

खारघर : सतत लागून आलेल्या चार सार्वजनिक सुट्टीचा फायदा घेवून राजकीय कार्यकर्त्यांनी खारघर सेक्टर बारा मध्ये  खेळाच्या मैदानावर अनधिकृत राम जानकी उभारले जात असून  पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 
 
         सिडकोने खारघर मध्ये सेक्टर निहाय उद्यान आणि मैदानासाठी राखीव भूखंड ठेवले आहे. दरम्यान खारघर  ग्राम पंचायत अस्तित्वात असताना त्यावेळी सदर मैदानात पंचायतच्या वतीने मुलांसाठी खेळणी उभारण्यात आली होती.  तर परिसरातील काही नागरिकांनी या मैदानाला डॉ बाबासाहेब मैदान असे नाव देवून फलक लावले. कालांतराने मैदानातील खेळणी मोडकळीस आल्यामुळे भंगार विक्रेत्यांनी खेळण्याचे  सांगाडे गायब केले. सदर मैदान सिडकोने पालिकेकडे हस्तांतर केले आहे. दरम्यान  14 ते 17 एप्रिल चार दिवस सार्वजनिक सुट्टी होती.  हि संधी साधून काही राजकीय व्यक्तीने सदर मैदानात अनधिकृतपणे राम  जानकी मंदिर उभारल्याने  नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. खारघर सेक्टर 12 मध्ये  शिव मंदिर, गणेश मंदिर, महाकाली मंदिर , दत्त मंदिर असताना मुलांना खेळण्यासाठी राखीव असलेल्या मैदानात अनधिकृतपणे आणि सिडकोकडून  कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्यामुळे रहिवासांमध्ये नाराजी पसरली आहे. या विषयी खारघर  प्रभाग अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सदर भूखंड सिडकोच्या ताब्यात असल्याचे सांगितले.
 
कोट - खारघर सेक्टर बारा मध्ये खेळाच्या मैदानात  उभारण्यात आलेल्या मंदिराची पाहणी करून कारवाई केली जाईल. - संतोष जाधव, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण अधिकारी सिडको.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

30 वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करणेबाबत जाहीर आवाहन