राज्यातील २८ महापालिकांच्या कर्मचारी-अधिकारी संघटनांचे नवी मुंबईत चर्चासत्र पार
नवी मुंबई-:राज्यातील २८ महानगरपालिकांमध्ये काम करणार्या कर्मचाऱ्यांना भेडसावत असणार्या समस्यांकडे राज्य सरकार त्याच प्रमाणे महानगरपालिका पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कर्मचाऱ्यांना न्यायिक हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कामगार, कर्मचारी संघटना फेडरेशन यांच्यावतीने एक दिवसीय चर्चा सत्राचे आयोजन नवी मुंबईतील सानपाडा येथे करण्यात आले होते. राज्य सरकारकडे विविध प्रश्नांसाठीआगामी काळात पाठपुरावा करण्या बरोबरच कामगारांच्या हितासाठी वेळप्रसंगी एकजुटीने आक्रमकपणे लढा सुरु करण्याचा निर्धार करण्यात करण्यात आला.
या चर्चा सत्रात महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कर्मचारी, कामगार संघटना फेडरेशनचे अध्यक्ष चरणसिंग टाक, नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी संघटनेचे प्रमुख व फेडरेशनचे उपाध्याक्ष विजय पाटील, सचिव गौतम खरात (औरंगाबाद मनपा), सचिव अशोक जानराव (सोलापूर मनपा), चंद्रकांत गमरे (पुणे मनपा), अनंत लोखंडे (अहमदनगर मनपा) आदी पदाधिकारी उपस्थित होते. करार कर्मचारी यांना कायम करणे . २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचारी अधिकारी यांना जुनी पेंशन योजना लागु करणे . आकृतीबंधानुसार मंजुर पदे तात्काळ भरणे . अनुकंपा धर्तीवरील रिक्त जागा तावडतोव भरणे . डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत इतर महापालिका प्रमाणेच नमुंमपाच्या सफाई कर्मचा-यांना मोफत घरे उपलब्ध करून देणे . लाड-पागे समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार कार्यवाही व्हावी . यासारख्या अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करून हे प्रश्न फेडरेशनच्या स्तरावरून शासन दरवारी मांडून नवी मुंबई सह सर्व महापालिकांना लाभ मिळवुन देणेबाबत चर्चा झाली.
सोलापुर मनपात २३०८ करार कर्मचारी कायम केले. औरंगाबाद महानगरपालिकेत २०४ करार कर्मचारी कायम केले . याच धर्तीवर घटनेच्या १४ व्या कलमानुसार नमुंमपातील सर्व पात्र करार कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आपल्यासोबत कायम राहु असे आश्वासन सोलापुर मनपाचे अशोक जानराव व औरंगाबाद मनपाचे गौतम खरात यांनी विजय पाटील यांना दिले.
सोलापुर व औरंगाबाद मनपाच्या धर्तीवर सदर विषयांवरील दोन्ही महानगरपालिकेचा प्रस्ताव व नस्तीचा अभ्यास करण्यात येणार आहे. घटनेच्या कलम १४ चे नुसार सर्व पात्र करार कर्मचा-यांना कायम करण्यासाठी नवी मुंबई मनपा कर्मचारी अधिकारी संघटना यापुढे कायद्याच्या चौकटीत राहुन प्रयत्न करणार आहे.
विजय पाटील,
उपाध्यक्ष,महानगरपालिका कर्मचारी, कामगार संघटना फेडरेशन