१७ एप्रिल ठाण्यात १० वी, ११ वी १२ वी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी मार्गदर्शन शिबीर
ठाणे : स्टाफ सिलेक्शन कमीशन परीक्षा जुलै २०२२ रोजी होणार असून त्यात १० वी, ११ वी, १२ वी, पदवीधर तरुणांना विविध पदांसाठी अर्ज करण्याची मुदत ३० एप्रिल २०२२ आहे. वयोमर्यादा २५-२७ वर्षापर्यंत असून या परिक्षेची माहिती, तयारीसाठी आगरी समाज मंडळ ठाणे परिसर या संस्थेने मोफत मार्गदर्शन शिबीर दि. १७ एप्रिल, २०२२ रोजी संध्या. ४ ते ७ या वेळेत, सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी, ठाणे (प.) - ४००६०२.येथे आयोजित केले असून या शिबिरात निवृत्त सहाय्यक आयुक्त, केंद्रीय उत्पादन शुल्क, लोकसत्तामधील ‘नोकरीची संधी’ स्तंभलेखक सुहास सिताराम पाटील मार्गदर्शन करणार असून या संधीचा २५-२७ वर्षाखालील उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे मंडळाचे अध्यक्ष्य निवृत्त प्रा. सी. जी. पाटील यांनी केले आहे. संपर्क ९८२००४५१६५,९८१९७०३८८८.