किल्याजवळील कमानीला "बेलापूर किल्ला प्रवेशद्वार" नाव द्यावे - राष्ट्रवादीच्या नितिन चव्हाण यांची मागणी
नवी मुंबई-:बेलापूर किल्ल्याजवळ नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने प्रवेद्वार बांधण्यात येत असून त्यास गोवर्धनी माता प्रवेशद्वार" नाव देण्याची तयारी सुरू आहे. मात्र सदर परिसर बेलापूर किल्याचा असल्याने या कमानिस बेलौ किल्ला प्रवेश द्वार देण्यासाठी यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नितीन चव्हाण यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सिडको कडून काढून राज्य पुरातत्व विभागाचे हस्तांतरण करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असताना नवी मुंबई महानगर पालिकेने सुरू केलेल्या बेलापुर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला "गोवर्धनी माता प्रवेशद्वार" नाव देण्याचे काम सुरू केले आहे. येत्या काळात किल्ल्याचे होणारे सुशोभिकरण व संवर्धन हे नवी मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणारे आहे. परंतु कर्नाटकीय शिल्पकलेतुन होणारी गोवर्धनी माता कमान की मंदिराच्या लगत करून तेथे रोषणाई वाढवावी व सदर ठिकाणी बेलापूर किल्ला प्रवेशद्वार नावाचीच कमान व्हावी. गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वार याच्या कामाचे कंत्राट रद्द न करता त्याची योग्य जागा निश्चित करावी व भविष्यात किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या कमानीच्या जागेसाठी येथे जागा राखीव ठेवावी अशी मागणी नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांनी मनपाआयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.