लाकडी पेट्या बनवणाऱ्या अवैध व्यवसायिकांवर कारवाई करा - बाळासाहेब शिंदें
नवी मुंबई-:आंब्याचा हंगाम सुरू होताच प्रशासनिक अधिकाऱ्यांशी हाथ मिळवणी करून एपीएमसी फळ मार्केट मधील अनधिकृत लाकडी पेट्या बनवणाऱ्यांच्या अवैध व्यवसायिकांचे पेव फुटते. मात्र या ठीकाणी साठवणूक केलेल्या गवतामुळे आगीच्या घटना घडत असून ८ एप्रिल रोजी पुन्हा त्याचा प्रत्यय लागलेल्या आगीने आला .त्यामुळे अशा व्यवसायिकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागनि मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी एपीएमसी सचिव यांच्या कडे केली आहे. तर सात दिवसात कारवाई न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करुन सदर व्यवसायिकांना बाहेर काढण्यात येईल असा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती मधील फळ मार्केटमध्ये सध्या आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. फळ मार्केट मध्ये एकूण १०२९ गाळे असून.आडत्या गाळा धारक १०११ व बिगर आडत्या गाळा धारक ३८० असून या मार्केट मध्ये दोन बहुउद्देशीय इमारती असून या ठिकाणी काही बँका, पतपेढ्या,माथाडी बोर्डाचे कार्यालय, मालमत्ता नोंदणी कार्यालय तसेच काही खाजगी कार्यालये देखील आहेत. या ठिकाणी ग्राहक,वाहतूक दार, व्यापारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने येत असतात.फळ विक्री करणेसाठी परवाना दिला असून या परवानगी अडून बरेच व्यापारी तर काही अनधिकृत व्यापारी राजरोस पणे मोठ्या प्रमाणात लाकडी पेट्या व गवत या बाजार आवारात तसेच परिसरात ठेवून अनधिकृत साठा करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
नुकतीच ८ एप्रिल रोजी रात्री बाजार आवारात या लाकडी पेट्या व गवतामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. यापूर्वी सुद्धा अश्या घटना घडल्या आहेत. परंतु भविष्यात अश्या प्रकारच्या घटना घडून जिवीतहानी किंवा इतर प्रकारे बाजार समितीचे व व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून फळ मार्केटची प्रत्यक्ष पडताळणी करून अनधिकृत साठा करणाऱ्या व्यापारी वर्गावर त्वरीत कडक कारवाई करून फळ मार्केटमध्ये असणारा साठा बाहेर काढावा किंवा जप्त करावा अशी मागणी एपीएमसी प्रशासनाकडे मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली असून सात दिवसात कारवाई न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करुन सदर व्यवसायिकांना बाहेर काढण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही एपीएमसी प्रशासनाची राहील असा इशारा देखील शिंदे यांनी दिला.