"महाराष्ट्र श्री २०२२" राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत पुरुष गटात मुंबईच्या अक्षय मोगरकरने पटकाविला किताब 

पनवेल : महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, बॉडी बिल्डर्स अँण्ड फिटनेस असोसिएशन रायगड, इंडियन बॉडी बिल्डर्स अँण्ड फिटनेस फेडरेशन आणि भारतीय जनता पार्टी विचुंबे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५९ व्या "महाराष्ट्र श्री २०२२" राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत पुरुष गटात मुंबईच्या अक्षय मोगरकरने तर महिला गटात हर्षदा पवारने किताब पटकाविला. 
 
विचुंबे गाव येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशियाई बॅाडीबिल्डींग चे सेक्रेटरी डॅा.संजय मोरे,  विचुंबे गाव कमिटीचे अध्यक्ष के. सी. पाटील,  नगरसेवक हरेश केणी, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नगरसेवक तेजस कांडपिळे,  विकास घरत, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कामगारनेते रवींद्र नाईक, सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, माजी सरपंच गणपत म्हात्रे, प्रमोद भगत, आलूराम केणी, विवेक भोईर,पोलीस पाटील प्रमोद नाईक, आयोजक व विचुंबे ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद भिंगारकर, असोसिएशनचे आयोजक सचिव दिनेश शेळके, रायगड कार्याध्यक्ष मारुती आडकर, ग्रा.पं.सदस्य रवींद्र भोईर, किशोर सुरते, नितीन भोईर, बळीराम पाटील मा.सरपंच विचुंबे, आकाश पाटील सरपंच विचुंबे, अनिल भोईर, जगदीश भोईर, शाम पाटील, सतीश म्हात्रे, नयन भोईर, डी.के.भोईर, अर्जुन सुरते, अविनाश गायकवाड, चेतन सुरते, चेतन भिंगारकर,अविनाश गायकवाड, सुनील पाटील, अनंता गायकवाड, यांच्यासह बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 
 
 
मेन्स बॅाडी ब्ल्डींग किताब विजेता
अक्षय मोगरकर (मुंबई)
 
वुमेंन्स बॅाडी बिल्डींग किताब विजेती
हर्षदा पवार (मुंबई)
 
मेंन्स क्लासिक बॅाडी बिल्डींग किताब विजेता- ऊदय देवरे (रायगड)
 
मेंन्स फिजिक्स किताब विजेता
गिरीश पाटील (रायगड)
 
वुमेंन्स बिकीनी किताब विजेती
श्रद्धा आनंद (मुंबई)
 
टीम चॅम्पियनशिप
प्रथम क्रमांक १४० गुण (रायगड)
द्वितीय क्रमांक ११८ गुण (मुंबई)
तृतीय क्रमांक ८५ गुण (पुणे)
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

350 हून अधिक चित्रकारांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चित्रांतून आदरांजली