रासायनिक पद्धतीने आंबा पिकवल्यास कारवाई होणार

नवी मुंबई-:एप्रिल महिन्यापासुन हापुस आंब्याच्या मुख्य हंगामाला सुरूवात होत असल्याने या दरम्यान आंब्याच्या मागणीत वाढ होत असते.त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेता काही व्यापारी झटपट नफ्यासाठी आंबा पिकविण्याकरीता  विक्रेत्यांकडून रासायनिक पदार्थाचा (कॅल्शियम काबाईड) उपयोग करतात.मात्र याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो. त्यामुळे अशा प्रकारे आंबा पिकवणाऱ्यांवर अन्न  औषध प्रशासन विभागाची करडी नजर असणार आहे.

 फळांचा राजा हापुस आंब्याच्या मुख्य हंगामाला  एप्रिल महिन्यापासून सुरुवात होते.त्यामुळे या आंब्याचा।गोडवा चाखण्यासाठी आंबा प्रेमी आसुसलेले असतात.वाशीच्या  एपीएमसी फळ बाजारात रत्नागिरी, हापूस, देवगड हापूस, केशर, आदी आंब्याची आवक होत असते. आणि मागणी अधिक असल्याने  व्यापारी  आधी मोठ्या प्रमाणात कच्चा माल स्वस्तात आणून त्यात रासायनिक औषधांचा वापर करून  तो  झटपट पिकवुन ग्राहकांना विकला जातो.मात्र अशा प्रकारे रासायानिक पदार्थाचा उपयोग करून तयार केलेली फळे ही आरोग्यास हानिकारक असतात  हे वारंवार तज्ज्ञांनी सांगितले आहे.मात्र झटपट पैसे कमावण्याच्या नादात काही व्यापारी आंबा पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थाचा (कॅल्शियम काबाईड) उपयोग करतात त्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर अन्न औषध प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत  असून यंदाच्या मौसमात देखील रासायनिक पध्दतीने आंबा पिकवणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे.अशी माहिती अन्न औषध प्रशासनाच्या अधीकाऱ्यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल येथे "योजना आपल्या दारी" अंतर्गत शासकीय योजनांचे शिबिर