ऐरोली सेक्टर १९ आणि २० च्या जनतेला अंधारातून बाहेर काढा ;पटणी रोडची दिवाबत्ती बंद

नवी मुंबई -: मागील काही  महिन्यापासून ऐरोली से.१९/२० मधील गुडविल टॉवर ते पटणी रोडची दिवाबत्ती बंद आहेत. त्यामुळे या रस्त्यावर  रात्रीच्या वेळी वाट काढताना  त्याचा नाहक त्रास रहिवाशी तसेच पटणी मार्गावर काम करणाऱ्या आयटी कंपनी मधील कर्मचाऱ्यांना बसत आहे.त्यामुळे ही येथील दिवाबत्ती तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी राहुल शिंदे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे केली आहे.अन्यथा नागरिक  कंदील घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला .

ऐरोली विभागतील पटणी रोड मागच्या  वर्षीपालिकेतर्फे बनवण्यात आला होता. दोन तीन महिन्यानंतर अचानकपणे या रस्त्यावरची दिवाबत्ती जाण्यास सुरुवात झाली वारंवार विद्युत विभागाला संपर्क केला तरी सुद्धा पटणी रोड हा दिघा मध्ये पडतो व से.१९/२० हे ऐरोली मध्ये येथे त्यामुळे नक्की डागडुजी ,देखभाल कोणी करायची अशी उत्तरे अधिकारी वर्गाकडून प्राप्त होत होती.गुडविल टॉवर ते पटणी रोड या रस्त्यात ऐरली से.२० खाडी किनारा सुद्धा येत असून ऐरोलीतील नागरिक पहाटे सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारायला येत असतात दिवाबत्ती बंद असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्याच बरोबर या रस्त्यात रहिवाशी संकुले सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.महापालिका हद्दीच्या वादात करदात्या जनतेला त्याचा नाहक त्रास का ? असा सवाल भाजपच्या राहुल शिंदे यांनी पालिका प्रशासनाला विचारला असून येणाऱ्या दिवसात जर दिवाबत्ती सुरू न झाल्यास प्रभागातील नागरिकांना दिवाबत्ती घेऊन नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जांभळी नाका येथे चैत्र नवरात्रोत्सवात आदेश बांदेकर यांचा मराठमोळा भोंडला रंगला